HERITAGE TO CORPORATE

Transformational corporate training modules

प्रस्तावना

दुर्ग संस्कृती म्हणजे नेमकं काय ?

छ. शिवरायांच्या किल्ल्यांपासून आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते. किल्ल्यांकडे प्रामुख्याने पर्यटन किंवा शौर्याचे प्रतिक म्हणून बघितले जाते.

"दुर्ग संस्कृती" या संकल्पनेत किल्ले - या निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींकडूनही कौशल्य, कार्य संस्कृती, आणि आजच्या कॉर्पोरेट जगाशी सुसंगत अनेक गोष्टी शिकण्याचा विचार आहे.

किल्ले आपल्याशी बोलतात, यावर आमचा विश्वास आहे !

दुर्ग संस्कृती संकल्पना

  • छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील निवडक किल्ल्यांचा आम्ही अभ्यास केला. अभ्यास केल्यावर असं लक्षात आले कि, किल्ल्यांच्या वैशिष्ट्यांचा आप ल्या कार्य संस्कृतीशी जवळचा संबंध आहे.
  • आपल्या कामात अधिक सकारात्मकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी ही वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. तसेच कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा हे दुर्ग प्रेरक ठरतात.
  • किल्ल्यांना दिलेल्या प्रत्यक्ष भेटी, त्यातून आम्हाला आलेले अनुभव, तसेच इतिहासकार आणि जाणकारांशी केलेली चर्चा - यातून तयार झालेली संकल्पना म्हणजे "दुर्ग संस्कृती".

कार्यशाळा कोणासाठी?

Corporate Houses and leaders

All types of companies / industries / IT companies

Entrepreneurs

Working Professionals

Business & Social Organizations

College and School Teachers & Students

विविध प्रशिक्षण कार्यशाळा / व्याखाने / उपक्रम

अ.न. विषय संकल्पना / ठळक मुद्दे कालावधी
१. दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती
[Forts Culture to Work Culture]
व्यावसायिक शिस्त, मानव संसाधन व्यवस्थापन, रिसोर्स युटीलायझेशन, दृष्टीकोन, दूरदृष्टी, शाश्वत विचार, आत्मविश्वास, मूल्य, संवाद कौशल्य, निष्ठा, कल्पकता, नेतृत्व, तणाव व्यवस्थापन या पैलूंचा उपयोग करून उत्पादकता आणि कार्यक्षमता विकसित करणे २ तास
जलदुर्गांची साखळी, कौशल्यांची मांदियाळी
[Corporate Skills from chain of Sea Forts]
प्रकल्प नियोजन आणि व्यवस्थापन, कल्पकता, सखोल विचार, नेतृत्व, समयसूचकता, दक्षता, समन्वय, जोखीम घेण्याची क्षमता, समस्या सोडवण्याचा दृष्टीकोन, टीम वर्क, आत्मनिर्भरता १ तास
क्रिटीकल थिंकिंग – ऐतिहासिक केस स्टडी
[Critical Thinking ... A historical case study]
छ. शिवाजी महाराजांच्या एका महत्वाच्या मोहिमेचा आधार घेऊन तर्क, विश्लेषण, मूल्यमापन, समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता या कौशल्यांचा अभ्यास करणे. १ तास
युथफुल टू आयकोनीक
[Youthful to Iconic]
इतिहासातल्या वीरांगनेचा पराक्रम, योगदान, तसेच तारुण्याचा उत्साह ते प्रभावी व्यक्तिमत्व होण्यापर्यंतचा प्रवास उलगडणारा प्रेरणादायी कार्यक्रम. १ तास
दुर्ग अभियांत्रिकी
[Engineering the Forts]
किल्ल्यांचे स्थापत्य, रचना, जलसंधारण आणि जलसंस्कुती, प्रभावी कौशल्ये. १ तास
दुर्गदर्शन क्लिक्स
[DurgDarshan Clicks]
किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
७   भावदुर्ग – गप्पा किल्ल्यांच्या किल्ल्यांची महती चारोळ्यांच्या माध्यमातून उलगडणारा दृक्श्राव्य कार्यक्रम १ तास
दुर्ग संस्कृतीतून व्यक्तिमत्व विकास शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरा (IKS) नुसार १ तास

मा. श्री. रघूजीराजे आंग्रे

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे विद्यमान वंशज
अध्यक्ष : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
तज्ञ सदस्य : किल्ले रायगड विकास प्राधिकरण

मा. प्रा. डॉ. प्रतिभा जोशी

माजी संचालक - हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, पुणे

मा. श्री. राहुल सोलापूरकर

ख्यातनाम अभिनेते, शिवचरित्राचे अभ्यासक, आणि सुप्रसिद्ध वक्ते

मा. श्री. वरुण भामरे

संवर्धन आर्किटेक्ट - रायगड विकास प्राधिकरण

श्री. देवदत्त गोखले

संशोधन अभ्यासक, संचालक - गोखलेज ऍडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जळगाव

सौ. रश्मी गोखले

संचालक - गतीज एडिटिंग सर्व्हिसेस, जळगाव

विविध पुस्तके आणि प्रोडक्ट्स

आजवरची आकडेवारी

200+
ट्रेनिंग्स

17k+
प्रशिक्षणार्थी

125+
संस्था

प्रतिक्रिया

काही क्षणचित्रे

व्याख्यानासाठी आजच संपर्क करा

आपण आपली माहिती खालील फॉर्मच्या माध्यमातून पाठवू शकता, आम्ही आपणास संपर्क करू
किंवा आपण 9881153936 या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.